#Malshiras:पिलीव येथील रस्त्याचे स्वखर्चातुन ग्रामस्थांनी केले मुरुमीकरण


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पशु वैद्यकीय दवाखान्यापासून महालक्ष्मी देवी कडे जाणार रस्ता जामदार वस्ती येथे खुप खराब झाला होता मोठया प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले होते पावसामुळे चिखल दल दल झाली होती.त्यामुळे लक्ष्मी देवीला जाणारे भाविक भक्त,तसेच एक नंबर वार्डतील नागरिकांची ह्या रस्त्यावर वाहने ,मोटारसायकल,शाळेतील मुलांच्या सायकली चालवताना खूप मोठी कसरत करावी लागत होती.ही बाब वार्डतील जहागिरदार पार्टीचे माजी उपसरपंच मोहन तात्या करांडे यांच्या लक्षात आली व त्यांनी तात्काळ पार्टीचे नेते संग्रामसिंह जहागिरदार यांचे निदर्शनास आणून दिली.यावेळी संग्राम दादा व मोहन तात्या करांडे यांचे मार्गदर्शनाखाली ह्या रस्त्याचे स्वखर्चातुन मुरुमीकरण केले .


यावेळी भा ज प शहर अध्यक्ष राजाभाऊ करांडे, उमेश बोडरे, दत्तात्रय बोडरे , नानासाहेब मदने, समशेर सिंग राजपूत, शरद जामदार,गजानन जनवर,सूरज करांडे,अनंत जामदार ,प्रमोद भैस , मोहसिन शेख, रणधीर सिंह जामदार, श्याम उपाध्ये,विजय करांडे, यांनी परिश्रम घेतले व सहकार्य केले आणि अडचणीच्या ठिकाणी मुरुमीकरण केले .त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत