#Natepute:भारतीय मातंग युवक संघटनेच्या मागणीला यश - केतन यादव


महादरबार न्यूज नेटवर्क -
दहिगाव ता - माळशिरस येथे भारतीय मातंग युवक संघटनेचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव यांच्या  वतीने दहिगाव येथील  नातेपुते वालचंदनगर रोडवरती गतिरोधक बसवण्यात यावे.काही दिवसांन पुर्वी ह्या मागणीसाठी कार्यकारी अभियंता  सार्वजनीक बांधकाम विभाग अकलूज  यांच्या कडे  संघटनेच्या वतीने मागणीचे निवेदनं देण्यात  आले होती. व या मागणीची दखल घेत दि -०६ सप्टेंबर २०२३ रोजी दहिगाव येथील नातेपुते वालचंदनगर रोडवरती दहिगाव हायस्कूल  दहिगाव ,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे चौक व अंगणवाडी येथे प्रामुख्यानें गतिरोधक बसण्यात आले.

यावेळी केतन यादव म्हणाले की ह्या मागणीसाठी सतत आम्ही पाठपूरावा करून हे काम आज पुर्ण झाले  आहे. या यशा मध्ये भारतीय मातंग युवक संघटणे सह या मध्ये दहिगाव  ग्रामस्थ व  महाराष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांचा ही वाटा आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम