#Indapur:केतन यादव यांची इंदापूर तालुका सुत गिरण संघाच्या संचालक पदी निवड
महादरबार न्यूज नेटवर्क -
इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून नवीन प्रकल्प येणार असल्याचे चर्चा सुरू असताना. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक केतन यादव यांची निवड इंदापूर तालुका सुतगिरण संघाच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे. केतन यादव हे सामाजिक चळवळीमध्ये काम करत असतात.
येणाऱ्या सर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि अशा वेळी नवीन प्रकल्प सुरू करत असताना अशा संयमी व्यक्तीमहत्वाचे गरज या प्रकल्पाला असल्यामुळे बालयोगी महेश्वरानंद महाराज यांच्या सूचनेनुसार त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती. मुख्यप्रवर्तक आकाश पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिले आहे. व ते पुढे म्हणाले की केतन आणि आम्ही सर्व सभासद एकत्रित रित्या येऊन जून २०२४ पर्यत कारखाना उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्व शेतकरी वर्गानी या कारखान्यास नोंदणी करावी असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment