#Chiplun:माखजन इंग्लिश स्कूलला सर्वोत्तम शाळा पुरस्कार जाहीर

    
मुंबई येथे एम.एम.आर.डी .ए च्या मैदानावर होणार वितरण सोहळा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूलला संगमेश्वर तालुक्यातील सर्वोत्तम शाळा म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग व इ.एस.एफ.सी च्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. 4 डिसेंबर रोजी मुंबई येथे बी.के.सी. येथील एम.एम.आर. डी. ए.च्या ग्राऊंडवर होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

प्रशालेकडुन हा पुरस्कार घेण्यासाठी मुख्याध्यापिका रूही पाटणकर, सहाय्यक शिक्षक ओंकार नामजोशी उपस्थित राहणार आहेत. शाळेच्या भौतिक सोयी सुविधा,वाढता गुणवत्ता आलेख,खेळा मधील नैपुण्य, संगीत विभाग, क्रीडा विभाग,समृद्ध ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण एकुणच सार्‍या सुविधा पाहता महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.पुरस्कार जाहीर झाल्याचे या शाळेतील आजी-माजी विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. शाळेला पुरस्कार मिळाल्याने संस्था अध्यक्ष आनंद साठे यांनी शाळा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम