#Yavat:भिमा पाटस कारखान्याचा पाहिला हप्ता ३००० रूपये जाहीर


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
भिमा पाटस कारखान्याने चालु गळीत हंगामाच्या गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला पाहिला हप्ता ३००० रूपये देण्याचा निर्णय एम आर एन ग्रुप चे अध्यक्ष मुर्गेश निराणी व चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल यांनी एकत्रित येऊन घेतला असल्याची माहिती चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना भिमा - पाटसचे चेअरमन तथा आमदार अॅड. राहुल कुल म्हणाले की, यावर्षी कारखान्यास येणाऱ्या ऊसास पहिला हप्ता 3000 रूपये जाहीर  केला आहे. त्यानुसार आजपासून हे बील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या मोळीपूजन कार्यक्रमावेळी आमदार अॅड. कुल यांनी इतरांच्या बरोबरीने भीमा पाटस देखील बाजार भाव देईल असे शेतकरी व सभासदांना आश्वासन दिले होते त्यानुसार 3000 रुपये भाव जाहीर करून हे आश्वासन आमदार अॅड. कुल यांनी पूर्ण केले आहे. सध्या भिमा - पाटसकारखाना पुर्ण क्षमतेने सुरु असून आज अखेर ६०,००० मेट्रिक टनाचे गाळप पुर्ण केले आहे. शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊस भिमा पाटस कारखान्यास देवुन सहकार्य करावे असे आव्हान ही अॅड. कुल यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम