#Malshiras:बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या चिरंजीवाच्या शाही विवाह सोहळयानिमीत्त विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती,विवाहानिमीत्त अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते व शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुक्यातील पहिले अध्यक्ष कै नानासाहेब आबाजी कर्णवर पाटील यांचे नातू व सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन डाॅ. बाळासाहेब कर्णवर पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव पै. गणेश व महाळुंग ता. माळशिरस येथील प्रगतीशील बागायतदार बिरा महादेव हाके पाटील यांची कन्या चि सौ का वैष्णवी यांचा विवाह गोरडवाडीच्या नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार रामभाऊ सातपुते,मा आ.आर. जी रुपनवर,मा.आ.सपकाळ (जावळी), भा.ज.पा.ज्येष्ठ नेते संग्रामसिंह जहागीरदार,अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, पुणे महसूल विभागाचे माजी आयुक्त प्रभाकरराव देशमुख, माजी आयुक्त जगताप, माजी सभापती जि प सांगली ब्रह्मानंद पडळकर,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे ट्रस्टी संभाजीराजे शिंदे,महेश काळे , माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, तुकाराम देशमुख, बाळासाहेब सरगर,उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ एम के इनामदार ,दीपक साळुंखे पाटील , विविध खात्यांचे राज्यस्तरीय सचिव, जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासनातील अधिकारी, उद्योगपती ,व्यापारी ,विविध संघटना, विविध पक्ष व पदाधिकारी ,माळशिरस, सांगोला, पंढरपूर,माण,आटपाडी इंदापूर, माढा, खटाव, विटा तसेच सांगली,सातारा ,सोलापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार व पाहुणेरावळे, आप्तसकीय यांच्या उपस्थितीमध्ये गोरज मुहूर्तावर फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये तोफांच्या सलामीत आणि विविध वाद्यांच्या गजरात व गीतांच्या संगीतामध्ये अतिशय आनंदी आणि उत्साहामध्ये विवाह समारंभ संपन्न झाला.

या विवाहामध्ये सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरीराव सर त्यांचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी, टी अँड टी ग्रुप,साई प्रो बायोफिल प्रा लि सा का कडलास , व्ही आय एस केमिकल्स प्रा लि कं, साई सेवन वव्हेंचुर प्रा.लि. हिंजवडी व कै नानासाहेब कर्णवर पाटील आणि कै तुकाराम (आप्पा) कर्णवर पाटील मित्र मंडळ,ए पी आय सोमनाथ कर्णवर पाटील, अजिनाथ कर्णवर,विनायक कर्णवर यांनी तसेच  कर्णवर पाटील परिवार व हाके पाटील परिवार यांनी उपस्थितांना वृक्ष देऊन " झाडे लावा झाडे जगवा", "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" हा संदेश दिला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे व या विवाहसोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम