#Malshiras:सुळेवाडी येथे गुरुजनांचा सत्कार व वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करीत आगळावेगळा वास्तुशांती समारंभ सोहळा साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस 
माळशिरस तालुक्यातील  सुळेवाडी येथील  हनुमंत  सुळे यांनी बांधलेल्या  विठ्ठल  पॅलेस  या बंगल्याची वास्तुशांती समारंभ सोहळा  आगळ्यावेगळ्या  पद्धतीने  साजरा  केल्याची पिलीव  परीसरात  सध्या  चर्चा  सुरु आहे. यामध्ये  सुळेवाडी येथील जि प प्राथमिक शाळेत तब्बल  विस वर्ष  विदयार्थीना  घडविणयाचे कार्य  करणाऱ्या  नारायण करांडे गुरुजींचा यावेळी  विठ्ठल  पॅलेसचे मालक हनुमंत  सुळे  यांनी नारायण करांडे  गुरुजी व त्यांचे आई- वडील म्हणजेच यावेळी  गुरुपुजन,मातृ पित्रु पुजन केले .यावेळी  नारायण करांडे  गुरुजी यांच्या मुळे  सुळेवाडी  सारख्या छोट्याशा  गावात विविध  क्षेत्रात  अनेक मोठ मोठे  अधिकारी  घडले याचे सर्व  श्रेय नारायण करांडे  गुरुजी यांना  जाते कारण त्यांनी याठिकाणी  शिस्तप्रिय  विदयार्थी  घडविणयाचे काम प्रामाणीकपणे  केले.तसेच  यावेळी  सुळेवाडी येथील  जि प शाळेतील शिक्षकांचा सन्मान  करणयात आला, तसेच  याठिकाणी  पारंपरिक  गझीढोल‌ कार्यक्रमाचे आयोजन  व संध्याकाळी  किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामुळे  सुळेवाडी येथील  विमा अधिकारी  हनुमंत  सुळे  यांच्या  विठ्ठल  पॅलेस  या नवीन  वास्तुच्या  आगवेगळया कार्यक्रमाची सध्या  जोरदार चर्चा सुरु आहे.यावेळी नारायण करांडे  गुरुजी  यांनी मनोगत व्यक्त  करताना  विदयार्थी घडविणयाचे  काम प्रामाणीकपणे केले  याची खरे तर या कार्यक्रमाच्या  निमीत्ताने  पोहच पावती मिळाली  असे उदगार  यावेळी  बोलताना  व्यक्त  केले.

यावेळी  पोलीस  उप अधिक्षक अप्पासाहेब  लेंगरे, आरटीओ अधिकारी  सर्जेराव  सुळे,नामदेव सुळे सर,विठ्ठल सुळे सर,महादेव इरकर सर,प्राध्यापक  प्रमोद  बिडे,पांडुरंग सुळे,अशोक  सोलंकर, राजु सुळे  ,युवराज  इरकर, लोकनेते उत्तमराव जानकर, आरिफखान पठाण, अशोक  बगाडे, संतोष पडळकर, नाथा सोलंकर, भानुदास सुळे, कृष्णा  सुळे, शिवराज पुकळे, विश्वजीत  गोरड,यांच्यासह‌ सुळेवाडी, पिलीव, बचेरी ,झिंजेवस्ती, कुसमोड  परिसरातील  राजकीय, सामाजिक, शैक्षणिक  व इतर क्षेत्रातील  मान्यवर  या कार्यक्रमास यावेळी  मोठ्या  संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन  युवराज इरकर  यांनी  तर आभार  हनुमंत  सुळे  यांनी मानले.   

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत