#Malshiras:सुळवस्ती शाळेचा शिवम शिंदे माळशिरस तालुक्यात प्रथम


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
प्रसन्न फाउंडेशन आयोजित टाॅप टेन ब्रिलीयंट स्टुडंट्स अवार्ड स्पर्धा परीक्षेत जि.प.शाळा सुळवस्ती चांदापुरी ता माळशिरस येथील 2 री मधील शिवम कुंडलीक शिंदे याने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.

याबद्दल शिवम शिंदे याचा सन्मान वयाच्या 22 व्या वर्षी UPSC Topper, भारतीय सेवेत IFS पदाला गवसणी घातलेले,ब्राझीलचे राजदुत,मळोली गावचे सुपुत्र मा.श्री.सुरज जाधव साहेब व माननीय गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

शिवमच्या यशाबद्दल त्याचे व त्याला मार्गदर्शन करणा-या शिक्षिका मोहिनी शिंदे-पवार  यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बापुराव सातपुते,चांदापुरीचे सरपंच जयवंत सुळ, उपसरपंच तात्यासाहेब चोरमले,सर्व ग्रा.पं.सदस्य,पालक,पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच विस्तार अधिकारी प्रदीपकुमार करडे साहेब,मुख्याध्यापक जोशी सर आणि केंद्रातील सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम