#Chiplun:आ.शेखर निकम यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये चिपळुण संगमेश्वर मतदार संघासाठी 54 कोटीचा निधी मंजूर


महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता  या रस्त्यांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने व दळणवळणासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी ओढाताण संपविण्यासाठी आमदारांनी सबब बाब महायुती सरकारच्या लक्षात आणून दिली. आमदारांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाने निधी उपलबद्ध करून दिला. या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी 12 कोटी 81 लाख निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते, पुल, वॉल यांसाठी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांसाठी 41 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मतदार संघासाठी दिलेल्या या निधीबद्दल आमदार  शेखर निकम यांनी महायुती सरकारचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे आभार मानले. सोबतच कोकणचे पहिले सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्रजी चव्हाण यांचे देखील विशेष आभार मानले.आ.शेखर निकम यांच्या प्रयत्नाने हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये चिपळुण संगमेश्वर मतदार संघासाठी 54 कोटीचा निधी मंजूर

नागपूर: जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांची झालेली अत्यंत दयनीय अवस्था पाहता  या रस्त्यांची दुरुस्ती होणे अत्यंत आवश्यक असल्याने व दळणवळणासाठी ग्रामीण भागातील नागरिकांची होणारी ओढाताण संपविण्यासाठी आमदारांनी सबब बाब महायुती सरकारच्या लक्षात आणून दिली. आमदारांच्या या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्त्यांसाठी शासनाने निधी उपलबद्ध करून दिला. या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण मार्गांसाठी 12 कोटी 81 लाख निधी मंजूर केला. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे रस्ते, पुल, वॉल यांसाठी चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांसाठी 41 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मतदार संघासाठी दिलेल्या या निधीबद्दल आमदार  शेखर निकम यांनी महायुती सरकारचे नेते मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांचे आभार मानले. सोबतच कोकणचे पहिले सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रविंद्रजी चव्हाण यांचे देखील विशेष आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम