#Natepute:दहिगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे - केतन यादव


महादरबार न्यूज नेटवर्क -
दहिगाव तालुका माळशिरस येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती माळशिरस व जिल्हा वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना भारतीय मातंग युवक संघटणा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख केतन यादव यांनी निवेदना द्वारे करण्यात आली आहे.

या वेळी केतन यादव म्हणाले की,दहिगाव हे गाव माळशिरस तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे गाव आहे.  दहिगाव अतिशय तिर्थक्षेत्र असुन सालाबाद जर वर्षी हजारो भाविक भक्त या तिर्थ क्षेत्राला दर्शन घेण्यासाठी येत असतात. सध्या अनेक साथीचे रोग येत आहेत. त्यांचा संसर्ग होऊ अनेक लोक आजारी पडत आहेत. येथे आरोग्य उपकेंद्र आहे परंतु त्याची वास्तू सिंगल  रूमची असून मोडकळीस आली आहे व तिथून आपूरी आरोग्यसेवा मिळत आहे. तरी दहिगाव येथे लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर करून  प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात यावे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम