#Varvand:गुलाबी थंडीच्या मोसमामुळे वातावरण झाले तजेलदार
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
स्वेटर ,मफलर उबदार वस्त्र परिधान केलेले लोक आता दिसू लागले व ग्रामीण भागात शेकोटी पेटू लागलेल्यात याचा अर्थ गुलाबी थंडी आगमन झाले आहे.
राज्यात थंडी सुरु झाली आहे त्याचप्रमाणे दौंड तालुक्यत सुद्धा गारवा निर्माण झाला आहे. सुखद अल्हाद आहे थंडीचा मोसम सुरू झालेला दिसत आहे गेले थंडी सुरू झालेली असतानाही थंडी पडत नव्हती, मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून संधीचा सुखद अल्लादायक वातावरण निर्मिती निसर्गतः सुरू झालेली आहे, या थंडीच्या सुंदर वातावरणाममुळे रोजचे मॉर्निंग वॉक करतात त्यांनाही वातावरण चांगले आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तुम्ही जेवढे जास्त व्यायाम करताना तेवढे शरीराला या हे वातावरण सुयोग्य आहे. आणि आरोग्य चांगले राहते असे जुने जाणकारा चे मत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा या थंडीचा फायदा होत आहे बाजरी कांदा गहू इतर पिके यांना या थंडीमुळे पोषक वातावरण असते, त्यांचे वाढ या वातावरणात चांगली होत असते, एकंदरीतच गुलाबी थंडीचा सर्वत्र आस्वाद लोक घेताना दिसत आहेत .त्यामुळे ही थंडी अजून काही कालावधी पर्यंत राहील अशी अपेक्षा आहे.
चार महिने थंडीचे मोसमातले ही सर्वात उशिरा थंडी सुरू झालेली आहे कारण मध्यंतरी आभाळ येणे वातावरण उष्ण किंवा पाऊस असे होत होते त्यामुळे चिंता नागरिकांमध्ये चिंता निर्माण होत होती थंडीचा मौसम असताना सुद्धा केव्हा पावसाळ्याचे वातावरण तर गरमी असे वातावरण झाल्याने थोडे चिंतेचे वातावरण निर्माण होत होते. एकंदरीत उशीर का होईना पण सुरू झालेली थंडीमुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे थंडीच्या सुंदर गारव्यात ऊस वाहतूक करणारे लोकगीत गात ऊस तोड करत आहेत . पुणे सोलापूर या रस्त्यावर सुद्धा वाहन चालकना आपल्या गाड्यांचे इंडिकेटर व दिवे लावावे लागतात, इतकी थंडी वाढलेली आहे.
Comments
Post a Comment