महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे विश्वस्त श्री एस एम देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार दि.9. ला यवत येथे आरोग्य शिबीर कॅम्प घेण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष शरद पाबळे व पुणे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवत येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य तपासणीचे शिबिर घेण्यात आले या शिबिरात यवत परिसरतील पत्रकारांनी आपली तपासणी करून घेतली या शिबिरात चा हेतू असा होता की प्रत्येक पत्रकार हा दैनंदिन दिनक्रमात आपल्या आरोग्या वर लक्ष देत नाही त्यामुळे या हेतूनेच आज मराठी पत्रकार परिषद चे विश्वस्त श्री एस .एम. देशमुख सर यांचे आदेश नुसार तपासणी घेण्यात आली.
यावेळी हाडांचे तज्ञ डॉक्टर बीपी शुगर चेक केल्या या या उपक्रमाला यवत येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व सर्वांचा सर्वांनी मोलाची मदत केली तसेच योग्य औषधोपचार व मार्गदर्शन केले या उपक्रमाला म्हणून पुणे येथील कमला नेहरू हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टर उपस्थित होते त्यांनी सुद्धा सर्व पत्रकारांची तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले यामध्ये येथील पत्रकार संदीप नवले, संदीप सोनवणे संदीप भालेराव विठ्ठल थोरात, मनोज खंडागळे ,विठ्ठल थोरात, भाऊ ठाकूर राहुल अवचट संतोष जगताप इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
0 Comments