#Natepute:कारुंडे बंगला येथे अज्ञातांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची स्थापना


महादरबार न्यूज नेटवर्क -
कारुंडे ता.माळशिरस हद्दीत महामार्ग नजिक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची स्थापना केली . रविवारी सकाळी सदर घटना नातेपुते परिसरात वार्यासारखी पसरली आणि तासाभरातच नातेपुते, कण्हेर, कारुंडे,कोथळे, धर्मपूरी, मोरोची, डोंबाळवाडी, एकशिव गावातील  धनगर समाजबांधव
यावेळी  यळकोट यळकोट जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी नातेपुते, कण्हेर,कारुंडे,कोथळे, धर्मपूरी,मोरोची,डोंबाळवाडी, एकशिव या गावातील बहुसंख्य धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम