#Natepute:भारतीय लोकशाहीचा आत्मा संविधान आहे - मुख्याधिकारी माधव खांडेकर
महादरबार न्यूज नेटवर्क -
आपले सविंधान कसे आहे, संविधानाचे उद्दिष्ट काय आहे.कुठल्याही धर्माला महत्त्व देताना समान दर्जा देणे.व्यक्तीला धर्म स्वातंत्र्य आहे. कुणावरही अन्याय न होण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे.सामाजिक ,लोकशाही,गणराज्य,व समता ह्या सर्व घटनेमध्ये सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविंधानाने आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्याधिकारी खांडेकर बोलत होते.
प्रस्ताविक समीर सोरटे यांनी केले.त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सविंधान अभ्यास वाचनाने कार्यक्रमला सुरुवात झाली.रिपाईचे तालुका सरचिटणीस रोहीत सोरटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष एन के साळवे,नातेपुते पोलिस स्टेशनचे ए पी आय महारूद्र परजने साहेब या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे हार,फेठा,व गुलाबपुष्प या सत्काराला बगल देत सर्व मान्यवरांना सविंधान उद्दीषिकाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष एन के साळवे,नातेपुते नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर,नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महारुद्र परजने,रिपाईचे युवराज वाघमारे,मा ग्रा सदस्य जनार्धन सोरटे,पँथर अध्यक्ष श्रावण सोरटे,शिवसेनेचे राजकुमार हिवरकर,निजाम काझी,नवाज सोरटे,मुख्याद्यापक पिसे सर,नगरसेवक सुरेंद्र सोरटे,नंदू लांडगे,विनोद रणदिवे,सोरटे गुरुजी,देठे गुरुजी,संघर्ष सोरटे,सुचित साळवे,सुगत सोरटे व जयंती उत्सव समितीचे सदस्य आणि भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन-प्रकाश साळवे यांनी केले व आभार बंटीराजे सोरटे यांनी मानले.
Comments
Post a Comment