#Chiplun:आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या माध्यमातून कळंबुशी गावातील विविध मंजूर विकास कामांचे भूमिपुजन सभापती सौ. पुजाताई निकम यांच्या हस्ते संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
आमदार शेखर गोविंदराव निकम यांचा माध्यमातून कळंबुशी गावातील मंजूर विकास कामांचा भूमिपूजन सोहळा चिपळूण च्या सभापती व आमदार निकम यांचा धर्मपत्नी सौ.पुजाताई निकम यांच्या हस्ते पार पडला.तसेच गावातील साई ते वडेर गाव रस्ता डांबीकरण करणे. अंगणवाडी ते बौद्धवाडी कडे जाणारा रस्ता करणे. वडेरू फाटा ते कळबुशी कासे- पेढंबे रस्ता रुंदीरण डांबरीकरण करणे. कळंबुशी जलजीवन न.पा.पू योजना करणे या कामाचे भूमिपूजन पार पडले. गावचा विकास करताना सर्वांनी एकत्र यावे व गावचा विकास करावा आमदार निकम साहेब नेहमीच तुमच्या विकास कामामध्ये कायम पुढे असतील.आज युवा वर्गाची व महिलांची उपस्थिती समाधानकारक दिसत आहे.युवा नेते अक्षय चव्हाण व तुमची विकास कामासाठी असणारी मागणी मी आमदार निकम साहेबांपर्यंत पोहचवेन व पुढील विकास कामे देखील लवकर मार्गी लागतील असे आश्वासन दिते. ग्रामस्थांनी देखील आम्ही सर्व एकजुटीचे आमदार निकम सरांच्या पाठीशी ठाम पणे आहोत व कायमस्वरूपी पाठीशी राहणार आहोत असा शब्द देण्यात आला.कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
या प्रसंगी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष श्री सुशीलजी भायजे,महिला जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती.अंकिता चव्हाण,गावचे सरपंच.श्री.सचिन चव्हाण,उपसरपंच आकाश चव्हाण,गावचे ग्रामप्रमुख सुमित चव्हाण,युवा नेते अक्षय चव्हाण, चेरमन गणपत, चव्हाण,सदस्य अंजली चव्हाण,दिनेश चव्हाण,सायली चव्हाण,महेश घाणेकर,मधुरा आग्रे, सुश्मिता काजवे माजी सरपंच विलास चव्हाण,मंदार चव्हाण,पोलीस पाटील सोनिया चव्हाण,प्रभाकर पवार,दत्तराम म्हापरले,रमेश पवार,संदीप काजवे,दत्तराम काजवे,हरेश काजवे,महेंद्र पवार,जयप्रकाश चव्हाण,अनंत दिवाळे,प्रकाश कारेकर,अरुण कारेकर,अनंत म्हापरले,प्रथमेश चव्हाण व मोठ्या संख्येने महिला वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment