#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील सरंद गावचे ग्रामदेवता नवराञौत्सवाला प्रारंभ
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील सरंद ग्रामदेवता नवराञौत्सवाला सोमवारपासुन प्रारंभ झाला आहे. घटस्थापनेच्या वेळी गाव देवीच्या मंदिरात सर्व मुर्ती उभ्या स्थितीत असुन शस्ञास्ञांनी सज्ज आहेत.श्री. नवलाई देवी, श्री. वाघजाई देवी, श्री.पावनाई देवी, काळकाई देवी , श्री. केदार अशा या मुर्ती आहेत.दि.५ आॅक्टोबर पर्यंत नवराञ उत्सव सुरू राहणार असुन नवराञोत्सवात ठरलेल्या राञी भजन,किर्तन,जाखडी नृत्य दांडीया किंवा गरबा यांसारखे कार्यक्रम आयोजित करुन राञभर देवीचा जागर होत असतो.
तसेच ग्रामदेवताच्या देवीच्या दर्शनाकरिता सामाजिक ,राजकीय ,सांस्कृतीक क्षेञातील मान्यवर येत असतात. शेवटच्या दिवशी सांयकाळी सोने लुटण्याचा धार्मिक कार्यक्रम आयोजित करुन गावकरी मंदिरात जमतात व देवतानां सोने वाहुन झाल्यावर एकमेकांना सोन वाटुन प्रेमभावना व बंधुभावाची देवाण - घेवाण करतात. तसेच वरील कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संरद ग्रामदेवता देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment