#Natepute: सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयात एच. एस. सी. बोर्ड परीक्षा सुरू
महादरबार न्यूज नेटवर्क -
दिनांक 21- 2 - 2024 रोजी केंद्र क्रमांक 0541 या केंद्रात एकूण विद्यार्थी 318 पैकी उपस्थित मुले 171 व मुली 139 व गैरहजर आठ असे होते. परीक्षा अतिशय चांगल्या वातावरणात सुरळीत पार पडल्या. परीक्षा बोर्ड नियमानुसार नियमित वेळेत सुरू झाल्या. मुलांना परीक्षा नियमाविषयी केंद्रावर सकाळी दहा वाजता माहिती सांगण्यात आली. तसेच शासकीय बैठे पथक केंद्रावर तीन तास उपस्थित होते. परीक्षा पार पाडण्यासाठी संस्थेच्या संस्थापिका. सोलापूर विद्यापीठ सिनेट सदस्य. सौ पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ आईसाहेब,सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर. सी बी .कोळेकर सर यांच्या नियंत्रणाखाली यशस्वीरित्या पार पडली.
या परीक्षा पार पाडण्यासाठी रत्नप्रभादेवी मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय नातेपुते मुख्याध्यापक श्री विजय उबाळे सर व अक्षय शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र चांगण सर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक मुळीक सर यांनी बैठे पथक म्हणून काम पाहिले. ही परीक्षा पार पाडण्यासाठी प्राध्यापक साठे सर व प्राध्यापक मोगल सर यांनी विशेष प्रयत्न केले.तसेच सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.अशी माहिती केंद्र संचालक प्राध्यापक बापूराव वाघमोडे यांनी दिली.
Comments
Post a Comment