#Chiplun धामापुर जिल्हा परिषद गटातील मौजे नारडुवे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून नारडुवे गावकरीता भरघोस निधी मंजुर करण्यात आला आहे त्यातील  नारडुवे बौध्ववाडी रस्ता खडीकरण करणे व जोगले वाडी रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुशील भायजे,विभाग अध्यक्ष श्री महेश बाष्टॆ,युवा नेते अक्षय चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले.

गावाचा विकास करताना आमदार निकम साहेब कधीही पक्ष भेद बघत नाहीत व त्यामुळेच जनता देखील  आमदार निकम सरांच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे असे मत भायजे यांनी व्यक्त केले.अक्षय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार निकम सर हे एकमेव असे आमदार आहेत जे राजकारण विरहीत विकास करत आहेत. मतांचा विचार न करता मतदार संघातील खेड्या पाड्याचा  विकास करणे हा एकच उद्देश ठेवून सर काम करीत आहेत. आपणं देखील सरांचा पाठीशी ठाम पणे उभ राहील पाहिजे अस मत व्यक्त केले.उपसरपंच श्री जोगळे यांनी आभार मानताना आमचा निर्धार पक्का आहे आम्ही सरांचा पाठीशी ठाम पणे उभे आहोत असे मत मांडले.

यावेळी गावचे सरपंच श्री.कृष्णा जोळगे, उपसरपंच श्री.विजय जोगळे,गावातील गावकरी ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम