Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati चंदूकाका सराफ अँड सन्स मध्ये पितृ दिन साजरा

सामाजिक बांधीलकी जोपासत विविध क्षेत्रातील पिता पुत्राचा सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
आई वात्सल्य चे प्रतीक तर वडील कुटूंबाचा आधार व जिथे विषय गंभीर त्या ठिकाणी वडिल खंबीर असतात हे प्रत्येक वेळी वडील,बाबा,पिता, बाप ही नावे दाखवून देतात त्यामुळे त्यांचे ऋण विसरू नये. व्यवसाय करताना सामाजिक भान ठेवून, संस्कृती ची जोपासना होणे साठी व संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी व वडीलाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी चंदू काका सराफ अँड सन्स यांच्या वतीने रविवार १६ जून २०२४ रोजी बारामती एमआयडीसी शाखा येथे जागतिक पितृ दिन (फादर्स डे) साजरा करण्यात आला.

या प्रसंगी विविध क्षेत्रातील पिता-पुत्र यांना आमंत्रित करण्यात आले होते अभिनय :  राहुल जगताप ढाकळकर व रुद्र प्रताप जगताप ढाकळकर-रणवीर जगताप ढाकळकर . उद्योगक्षेत्र : राजेश जाधव- मुलगी सौ सृष्टी कांडगे
व्यवसाय :संदीप दुरुगरकर- कु .गौरी दुरुगरकर, शिक्षण: सतीश भोसले-हर्षल भोसले,खेळ अनिल सावळे पाटील, आर्यमॅन ओम सावळेपाटील.पारंपरिक पद्धतीने पित्याचे  चरण पूजन करून सन्मान मुलांनी व मुलींनी केला.
या वेळी  प्रसिद्ध ज्योतिषचार्य श्री विजय कुलकर्णी यांनी दिव्य रत्न बदल माहिती दिली.
या प्रसंगी सेल्स हेड दीपक वाबळे, कुमार राठोड यांचे मार्गदर्शन लाभले उद्योजक  योगेश ओमासे, सचिन जाधव आदी उपस्थीत होते.

एमआयडीसी शाखा व्यवस्थापक  राहुल  घोरपडे यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन  धनंजय माने यांनी केले व मान्यवरांचे आभार फ्लोअर मॅनेजर  अतुल पालीवाल यांनी मानले.

Post a Comment

0 Comments