#Malshiras बचेरीचे सुपूत्र अजय लक्ष्मण गोरड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील बचेरी गावचे सुपुत्र अजय लक्ष्मण गोरड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. बचेरी सारख्या दुष्काळी गावातुन प्रतिकुल परिस्थिती असताना त्यांनी या पदाला गवसणी घातली.२००४ मध्ये १८ व्या वर्षी अकोला येथे पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले पोलीस दलात नोकरी करत असताना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन पदवीचे शिक्षण पूर्ण केले व २०१० मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले .अकोला येथे अडीच वर्षे सेवा केली त्यांतर सहहयाक पोलीस निरीक्षक म्हणून पुणे ,ग्रामीण येथे व नंतर सातारा व अहमदनगर येथे सेवा बजावली.
पोलीस दलात नोकरी करीत असताना अतिशय उल्लेखनिय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल अजय गोरड यांना केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक,महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील महाराष्ट्रातील सर्वोच्च पदक पोलीस महासंचालक पदक २०२२ मध्ये मिळाले . त्यांचे प्राथमिक शिक्षण जि परिषद प्राथमिक बचेरी,पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण जवाहरलाल शेतकी विदयालय पिलीव, अकरावी ,बारावीचे शिक्षण आटपाडी येथे झाले. त्यांना बी एसी अग्री ला प्रवेश मिळाला होता पण घरची परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडुन देऊन पोलीस दलात ते भरती झाले.त्यांनी पोलीस दलात काम करीत असताना आपल्या गावाचा नावलौकिक वाढविला.त्यांच्या हया यशामध्ये आई,वडील,भाऊ,बहीण,पत्नी, मुलांचा व नातेवाईकांचा मोलाचा वाटा आहे. अजय गोरड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्याबद्दल बचेरी,पिलीव परीसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्याकडुन त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment