#Chiplun पक्ष संघटना बळकट करा, विकासकामांची जबाबदारी माझी - आ. शेखर निकम
कुटरे येथील राजेंद्र मोलक यांच्यासह कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी आश्वासन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन कोकरे जिल्हा परिषद गटातील कुटरे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र मोलक आणि कुटरे माजी सरपंच सुवर्णा मोलक यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी प्रवेशकर्त्यांचे जंगी स्वागत केले.
️
आमदार शेखर निकम यांचे अगोदरपासून गावागावात विकास करण्याचे ध्येय होते आणि त्या सानिध्यातून त्याचे समाजकार्य चालूच होते. मात्र आमदार होण्याची संधी त्यांना जनतेच्या माध्यमातून मिळाली. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आमदार झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावात नियोजनबद्ध असा विविध विकास कामाचा झपाटा लावला. त्यातून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळीच भूरळ पाडली व जनतेमध्ये छाप पाडली. कला, क्रीडा, पर्यटन, शिक्षण, उद्योग व ग्रामिण भागातील विविध विकास कामे करत तसेच बरेचशे प्रलंबीत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून दिला.
️
कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून कोकरे जिल्हा परिषद गटातील कुटरे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र मोलक आणि कुटरे माजी सरपंच सुवर्णा मोलक याच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये लक्ष्मण चिनकटे, संतोष सुटाके (बारक्या), मारुती सावरटकर, रामकृष्ण सावरटकर, सुरेश निकम, प्रकाश निकम यांचा समावेश आहे. या प्रवेशकर्त्यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले व राष्ट्रवादी पक्षामध्ये स्वागत केले.
️
पक्षांर्गत कामे करताना संघटीत होवून कामे करा व पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत-जास्त प्रयत्नशील रहा. यामध्ये लहान-मोठे, पदाधिकारी-कार्यकर्ते, जूने-नवीन कार्यकर्ते हा भेदभाव विसरुन सर्वानी एकमेकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार करा. विकास कामांची, निधीची तुम्ही चिंता करु नका ती माझी जबाबदारी राहील, असा शब्द आमदार निकम यांनी ग्रामस्थांना दिला. आपणास दिलेली आश्वासने पुर्ण करण्यास कायम कठीबद्ध राहणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
️
यावेळी राजेंद्र पोमेडकर, जाकीर शेखासन, सुशिल भायजे, तालुका उपाध्यक्ष दत्ताशेठ गुजर, सह-सचिव सुधिर राजेशिर्के, कोकरे जि. प. अध्यक्ष संजय कदम, बाळू राजेशिर्के, बुवा धावडे, संतोष राजेशिर्के इ. पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment