#Chiplun मठाधीश भाईनाथजी महाराज यांच्याकडून जि.प.धामणी नं.१ येथे शैक्षणिक साहित्य वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  
धामणी येथे बुधवार दि. १९ जुन रोजी जि.प.आदर्श  केंद्रशाळा धामणी नं.१  ता. संगमेश्वर या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा अंगिकारलेले श्री श्री श्री महंत पीरयोगी भाईनाथजी महाराज " मठाधीश कालभैरव मठ खोपोली यांच्या वतीने धामणी गावातील सर्व शाळांमधील गरजू व होतकरू मुलाना शालेय गणवेश, दप्तर, छत्री,वह्या ,पेन,कंपासपेटी इत्यादी शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांच्या स्पर्धा  परीक्षांसाठी महाराजांनी चांगली आर्थिक  तरतूद केली.

सदर कार्यक्रमास स्वामीभक्त श्री.प्रभाकर शेठ घाणेकर,  उपसरपंच श्री संगम पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती सप्रे,प्राजक्ता घाणेकर, सौ प्रेरणा लिंगायत, सौ शर्मिला गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  केंद्र प्रमुख श्री जंगम, मुख्याध्यापक श्री गेल्ये,सर्व शिक्षक, श्री दिगंबर लिंगायत ( वार्ताहर) ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सदर कार्यक्रम उद्योजक श्री प्रभाकर शेठ घाणेकर यांच्या अथक प्रयत्नातून  आणि प्रेरणेतून गेली १५ वर्षे अखंडपणे पार पडत आहे. कार्यक्रमाला स्वतः मठाधीश भाईनाथजी महाराज आणि त्यांचे भक्तगण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुरव गुरूजी जि.प.शाळा धामणी नं.२ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत