#Yavat २१ जुलै रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन, शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन; नामदेव ताकवणे यांची माहिती
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा नोकरी महोत्सव दौंडमध्ये रविवार दि.२१ जुलै रोजी होत असून या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नामदेव ताकवणे यांनी आज रविवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. हा नोकरी महोत्सव वरवंड येथील सिद्धीराज मंगल कार्यालयात होणार आहे.
या नोकरी महोत्सवात दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील नामांकित मोठ्या कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. अपंग तरुणांना देखील या मोहत्सवात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना कंपन्यांच्या वतीने नोकरी मिळणार आहे. दौंड तालुक्यातील, तसेच पुणे जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी नोकरी महोत्सवात नाव नोंदणी करून सहभाग नोंदवण्याचे आवाहन नामदेव ताकवणे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment