#Natepute जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूक्ष्म नियोजनामुळे सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते व माळशिरस येथील दोन मुक्काम यशस्वी पार पडले - मूख्याधिकारी माधव खांडेकर


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरपंचायत मुक्कामी नाविन्यपूर्ण सोयी सुविधा
सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम हा नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये असतो .नातेपुते परिसरामध्ये चार लाख भाविक मुक्काम करतात त्यासाठी नातेपुते नगरपंचायतीने सर्व सोयी सुविधा वारकऱ्यांना उपलब्ध करून दिले


   स्वच्छता
मागील एक महिन्यापासून पालखी तळाची स्वच्छता ,झाडेझुडपे काढणे,मुरुमीकरण करणे, गावामध्ये ज्या ठिकाणी दिंड्या थांबतात त्या ठिकाणी स्वच्छता करून देणे, गावामध्ये जंतुनाशक धूर फवारणी करणे इत्यादी स्वच्छता विषय कामे वेळेत पूर्ण करण्यात आले त्यासाठी नगरपालिकेचे ७५ सफाई कर्मचारी पूर्ण वेळ काम करत होते.


   मोबाईल टॉयलेट
एकूण २० ठिकाणी १८०० मोबाईल टॉयलेट बसविण्यात आले होते, सदर शौचालयाचे वेळोवेळी साफसफाई जेट्टिंग मशीन च्याय सहायने करण्यात आली. शौचालयाचा प्रत्येक ठिकाणी १५ स्वच्छालय मागे एक सफाई कर्मचारी व २५  टॉयलेट मागे एक सुपरवायझर नेमण्यात आला होता. त्यावर नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांचे नियंत्रण ठेवण्यात आले होते. यामुळे सर्व टॉयलेट ठिकाणी पाणी स्वच्छता या सुविधा उपलब्ध झाले. वॉकी टॉकी च्या साह्याने नगरपंचायत नियंत्रक अधिकारी व मोबाईल टॉयलेट सुपरवायझर यामध्ये कम्युनिकेशन ठेवण्यात आले होते.
सुलभ इंटरनॅशनल ची ४० शौचालय व स्नानगृह मोफत वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले होते

शौचालयाला पाणीपुरवठा करणाऱ्या टँकर साठी स्वतंत्र फीडिंग पॉइट ठेवण्यात आला होता त्यामुळे टँकर वेळेवर भरून स्वच्छालय ठिकाणी येत होते

महिला वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा
जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशामुळे महिला वारकऱ्यांना विशेष सुविधा देण्यावर भर देण्यात आलेला होता. यामध्ये महिला वारकऱ्यांसाठी तात्पुरते स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात आले होते, पालखीतळाच्या बाजूला एकूण ५८ स्वतंत्र महिला स्नानगृहामध्ये महिलांसाठी शॉवरच्या माध्यमातून अंघोळीची सोय करण्यात आली होती , त्याचबरोबर स्वतंत्र चेंजिंग रूमही तयार करण्यात आले होते. याचा लाभ हजारो महिला वारकऱ्यांनी घेतला व प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या सोयी सुविधा बद्दल आभार व्यक्त केले. या बरोबरच पुरुषांसाठी स्वतंत्र तीस शावर उभारण्यात आलेले होते .

सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन
महिलांसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन बसविण्यात आले होते या माध्यमातून महिलांना मोफत सॅनिटरी पॅड नगरपंचायतीच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले.

हिरकणी कक्ष
लहान मुलांसाठी व स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष उभारण्यात आला होता .त्या ठिकाणी पाळणाघर, दूध सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती .त्याचबरोबर त्या ठिकाणी राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती अंगणवाडी सेविका च्या माध्यमातून वारकऱ्यांना देण्यात येत होती.  अशा सेविकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती वारकऱ्यांना करून दिली

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची पाहणी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रूपालीताई चाकणकर यांनी प्रशासनाच्या वतीने नातेपुते नगरपंचायत हद्दीत महिला वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली. रूपालीताई चाकणकर यांनी महिला स्नानगृह तसेच हिरकणी कक्षाचे उद्घाटन केले. सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच महिला स्नानगृह याची पाहणी करून चाकणकर यांनी या सुविधाचा व्हिडिओ तयार करून त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्धी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांचे कौतुक  केले. राज्य महिला आयोग महिला वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचे प्रयत्न करीत असल्याबाबत सांगितले

मोबाईल चार्जिंग कक्ष
आजच्या काळाची गरज लक्षात घेऊन व वारकऱ्यांची होत असलेली अडचण लक्षात घेऊन नगरपंचायत व महावितरण चे वतीने पालखीतळावर मोबाईल चार्जिंग कक्ष उभारण्यात आलेला होता. पत्रा शेडमध्ये मोबाईल चार्जिंग साठी अनेक पॉईंट काढून देण्यात आले होते याचा लाभ अनेक वारकऱ्यांनी घेतला व समाधान व्यक्त केले

कचराकुंड्या
पुणे पंढरपूर रस्त्यावर तसेच पालखी तळावर ठीक ठिकाणी कचरा गाड्या  उभा करण्यात आल्या होत्या व त्या ठिकाणी सफाई कर्मचारी थांबून वेळोवेळी पडलेला कचरा उचलत होते त्यामुळे साफसफाईवर ताण निर्माण झाला नाही व वारकऱ्यांना त्रास झाला नाही

पाणीपुरवठा
ज्ञानेश्वर माऊली पालखी मार्गावर शासनामार्फत एकूण ७६ टँकरच्या माध्यमातून वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
वारकऱ्यांना चांगले आणि शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे म्हणून नगरपंचायतीमार्फत एकूण आठ ठिकाणी टँकर फीडींग पॉईंट ची सोय करण्यात आली होती त्यामध्ये टीसीएल टाकून पाणी टँकर मध्ये भरणा केले जात होते.

विद्युत रोषणाई
पालखीतळावर एकूण १५ हाय मस्ट व्यतिरिक्त ४०० वॅटचे एकूण ४२ दिवे जनरेटर च्या साह्याने चालू करून विद्युत पुरवठा करण्यात आला त्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला नाही

जेसीपी मधून पुष्पृष्टी करून माऊलींचे स्वागत
नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने माऊलींचे स्वागत पुष्पवृष्टी करून करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम