Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun देवरुख शहर वरची आळी तांबळवाडी येथील स्वखर्चाने दिलेल्या पाण्याच्या टाकीचे आ.शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  
तांबळवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार श्री.शेखरजी निकम सर यांना भेटून पाण्याच्या टाकीची मागणी केली होती,तेव्हा दिलेल्या शब्दा प्रमाणे आ. श्री.निकम यांनी  स्वखर्चाने पाण्याची टाकी देऊन कायमची अडचण दूर केली.

आमदार श्री.शेखर निकम  यांनी फक्त मतांचा विचार न करता निरपेक्ष भावनेने केलेल्या कामांबद्दल सगळी कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
तांबळवाडी येथील महिला भगिनी व ग्रामस्थांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.शेखर निकम  यांचे मन :पूर्वक आभार मानले.

यावेळी हनिफ शेठ हरचिरकर,बाळूशेठ ढवळे,पंकज पुसाळकर,प्रफुल्ल भुवड,मंगेश बांडागळे,बंडू जाधव,रविंद्र लाड,दिपक परशुराम,संदीप पारते,प्रदीफ पर्शराम,नागेश पर्शराम,सुदेश पर्शराम,प्रवीण पर्शराम व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments