महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील यवत येथील श्री महालक्ष्मी मातेची यात्रा दिनांक ४ रोजी संपन्न झाली ,महालक्ष्मी देवस्थान जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत येथे नवस फेडण्यासाठी जिल्ह्यातून पुणे मुंबई या सर्वत्र ठिकाण वरून लोक येथे येत मंदिराची विद्युत रोषणाई व फुलांनी सजवून आकर्षक सजावट केली जाते. येथे हि यात्रा आषाढ पौर्णिमेपासून भरत असते या यात्रेत दर रविवारी मंगळवारी शुक्रवारी खूप गर्दी असते.
यात्रेत वाहनांची पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आलेली होती, चार चाकी लावण्यासाठी वेगळे व्यवस्था करण्यात आली होती तसेच सुरक्षा रक्षक ही नेमले होते. मांसाहारी व शाकाहारी चा नैवेद्य दिला जातो. या यात्रेत दुरदूरचे ठिकाण चे नागरिक येतात, यात्रेत पाळणे व इतर सजावटीचे दुकाने सजलेली दिसत होती. शुक्रवारी येथील यात्रे खूप गर्दी होत असते होती खेळणी पूजेचे साहित्य असणारे दुकाने होती.काल रविवार असल्यामुळे भक्तांची गर्दी होती.
0 Comments