#Natepute अक्षय शिक्षण संस्था येथे स्वातंञ्यदिन उत्साहात साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -
येथील अक्षय शिक्षण संस्था,नातेपुते घुगरदरे प्रशाला प्राथमिक माध्य.ज्युनिअर, काॅलेज येथे स्वातंञ्यदिना निमित्त  डाॅ.काजल कवितके यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.


यावेळी संस्था सभापती श्री.हनुमंतराव धालपे,संस्था सचिव श्री दिलीप मालक घुगरदरे जेष्ठ संचालक डाॅ.विठ्ठलकाका कवितके विश्वस्थ श्री.नंदकिशोर धालपे, सौ.स्नेहल घुगरदरे, पञकार उमेशजी पोतदार, मुख्याध्यापक श्री.चांगण सर सर्व विभागप्रमुख पालकवर्ग सेवक वर्ग सर्व विद्यार्थी उपस्थित होते,ध्वजवंदना राष्ट्रगीत ध्वजगीत महाराष्ट्रगीत संविधानप्रतिज्ञा होवुन यानंतर वंदनिय भारतमाता प्रतिमापुजन मान्यवरांच्या शुभहस्ते होवुन,विशेष नैपुण्य प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच आज वाढदिवस असणार्‍या विद्यार्थ्यांनां  मान्यवराच्यां हस्ते गुलाबपुष्प देवुन शुभेच्छा देण्यात आल्या ,  संस्थेच्या कार्यात नेहमीच भरीव मदत देणार्‍या माजी विद्यार्थी श्री.निहाल मुलाणी परीवार यांचा सन्मानाने उल्लेख करण्यात आला.

प्रमुख अतिथी डॉक्टर काजल कवीतके मॅडम यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतात देशाची आजवरची वाटचाल शेतकरी शहीद जवान आणि देश कार्यात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचा प्रामुख्याने उल्लेख करून देशा प्रती संस्थेचे असणारे योगदान कौतुकास्पद आहे असा उल्लेख केला.समारंभाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन निवेदन श्री सुखदेव वालेकर सर यांनी केले समारंभा नंतर पाहुण्यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम