#Chiplun अखेर चिपळूणच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेचे स्वप्न उतरले सत्यात
आमदार शेखर निकम यांनी मानले महायुतीचे आभार
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सरकारने नगरोत्थान महाअभियानांतर्गत येथील नगर परिषदेच्या १५५ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या ग्रॅव्हिटी पाणी योजनेच्या मंजूरीचा शासन जीआर शुक्रवारी सायंकाळी निघाला आणि गेल्या अनेक वर्षांपासून चिपळूणवासीयांनी पाहीलेले ग्रॅव्हिटी पाणी योजनेचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे. आता योजनेतील सर्व अडथळे दूर झाले असून येत्या पंधरा दिवसांत योजनेची निविदा प्रसिध्द होऊन लवकरच भूमिपूजन होऊन कामालाही सुरूवात होणार आहे. योजना मार्गी लागल्याने या योजनेवरून मध्यंतरी उडालेल्या वावडयांना आमदार शेखर निकम यांनी आपल्या पाठपुराव्यातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. चिपळूणवासीयांचा ज्वलंत विषय मार्गी लावल्याबद्दल आमदार निकम यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.
कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीची नळपाणी योजना चिपळूण शहरासाठी व्हावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अनेकांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. यातून २०१७ मध्ये पुणे येथील एका कंपनीमार्फत सर्वेक्षण देखील करण्यात आले होते. यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या. अखेर आमदार निकम यांनी सुरूवातीपासून या विषयात लक्ष घालत पाठपुरावा सुरू ठेवला. यातून पावसाळी अधिवेशनादरम्यान सुमारे १६० कोटी रुपयांया या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवून घेण्यात यश मिळवले. त्यानंतर त्यांनी प्रशासकीय मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर गेल्या राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत १५५ कोटी ८४ लाख रुपये किंमतीच्या ग्रॅव्हिटी पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळाली. अखेर शुक्रवार दि. १६.०८.२०२४ रोजी या योजनाचा शासन जीआरही निघाल्याने या योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच निविदा प्रक्रीयेला सुरूवात होणार असून भूमीपूजन होऊन प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. योजनेचा मार्ग पुर्णत: सुकर झाल्याबद्दल शहरवासीयांकडून आमदार शेखर निकम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चिपळूण शहराच्या पाण्याचा ज्वलंत विषय मार्गी लावल्याबद्दल आमदार शेखर निकम यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, सुनील तटकरे, सर्व माजी नगरसेवक, शहरातील नागरीक, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनाही धन्यवाद दिले आहेत. त्याचबरोबर या योजनेचा फाईल प्रवास सुरू झाल्यापासून अंतिम मंजूरीपर्यत योगदान दिलेले नगरविकास-२ चे प्रधान सचिव गोविंदराज, नगरविकास मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुध्दे, नगरविकास उपसचिव श्रीकांत आंडगे, कक्ष अधिकारी गजानन आलेवाड तसेच पाणी आरक्षण प्रस्तावास चिपळूणच्या नागरीकांचे हित लक्षात घेऊन जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दिपक कपूर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जलसंपदा कोकण प्रदेश मुख्य अभियंता मिलिंद नाईक यांसह चिपळूण नगरपरिषद मुख्याधिकारी विशाल भोसले, सर्व कर्मचारी वृंद, योजनेचे तांत्रिक सल्लागार सचिन जोशी या सर्वांचे योगदान या योजनेच्या मंजूरीत महत्वपूर्ण असल्याने त्यांचा आवर्जुन उल्लेख करत आमदार निकम यांनी या सर्वांना धन्यवाद देत आभार मानले आहेत.
गेल्या पाच वर्षात सुरूवातीला कोरोना महामारी, नंतर महापूर अशी अनेक नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागले. अशाही परिस्थितीत चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तब्बल तेराशे कोटीहून अधिकचा निधी आणला, त्यातून महत्वाची विकासकामे मार्गी लागून हा मतदारसंघ विकासाच्या वाटेवर आणून ठेवला. मात्र या सर्व विकासामध्ये चिपळूणची ग्रॅव्हीटी योजना मार्गी लावणे हे एक माझ्यासाठी चॅलेंज होतं आणि आज ते महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेले. आजपर्यत केलेल्या विकास कामांमधील सर्वात महत्वाचे आणि मोठं काम म्हणजे ही ग्रॅव्हीटी पाणी योजना आहे. माझ्यादृष्टीने हे एक मोठं यश आहे. चिपळूणवासीयांनी पाहीलेलं स्वप्न आता सत्यात उतरलं यांचे नागरीकांप्रमाणे मलाही आनंद आहे.

Comments
Post a Comment