#Chiplun रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन आयोजित तालुकास्तरीय घरगुती गौराई व गणपती सजावट स्पर्धा २०२४


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
मंगलमयी गणेश उत्सवातला आनंद द्विगुणित करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील सामाजिक क्षेत्रात आघाडीवर राहून विविध उपक्रम राबविणाऱ्या रंजिता चॅरिटेबल फाउंडेशन च्या वतीने चिपळूण तालुकास्तरीय घरगुती गौराई गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी ९६२३११०८२० या व्हाट्सअप क्रमांकावर ज्या घरी गणपती किंवा गौरी गणपती असतील तसा स्पष्ट उल्लेख करीत आपलं नाव पत्ता व फोन नंबर पाठवावा
परीक्षक स्पर्धकांच्या घरी फोन करून परीक्षण करण्यासाठी येतील.

प्रथम क्रमांक चांदीची गणेश मूर्ती
द्वितीय क्रमांक चांदीची लक्ष्मी मूर्ती
तृतीय क्रमांक चांदीचे त्रिशूल
सहा उत्तेजनार्थ चांदीचे मोदक
गौराई सजावट व गणपती सजावट दोन्हीचे वेगवेगळे क्रमांक काढण्यात येतील प्रत्येक स्पर्धकास प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल स्पर्धेतील सहभाग नोंदणीसाठी शेवटची तारीख १०सप्टेंबर असून स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रंजिता चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्षा रंजिता ओतारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम