#Yavat दौंड प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा सन्मान


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
सुवर्णकन्या फाउंडेशन संस्था व दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे काम कौतुकास्पद असल्याचे मत दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी व्यक्त केले. खामगाव ता.दौड येथे सुवर्णकन्या फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील विविध सेवाभावी संस्था प्रशासकीय क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सुवर्णकन्या फाउंडेशनच्या वतीने प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ दौंड तालुका यांना शिवस्वराज्य जीवनगौरव पुरस्कार देऊन आज दि. १ सप्टेंबर रोजी खामगाव येथील अमोल मंगल कार्यालय येथे दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाला सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. दौंड तालुका प्रिंट व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष संदीप सोनवणे सचिव राहुल कुमार अवचट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान
सुवर्णकन्या फाउंडेशनच्या माध्यमातून लष्करातील सेवानिवृत्त जवान यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. खामगाव परिसरातील शिक्षण आरोग्य प्रशासकीय सामाजिक महिला व बालविकास राजकीय सांप्रदायिक क्षेत्रात काम करत असलेल्या सुमारे 300 लोकांचा यावेळी सन्मान करण्यात आला

दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्त्या वैशाली नागवडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सुशांत दरेकर, सिने अभिनेता सुभाष यादव आदिनी संबंधित कार्यक्रमास भेट देत सुवर्णयुग फाउंडेशनचे अध्यक्ष विलास नागवडे व सहकाऱ्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी भिमा पाटस कारखान्याचे माजी संचालक जगन्नाथ नागवडे, प्रकाश शेळके, युवा उद्योजक निलेश यादव, डॉक्टर संदीप खेडेकर,आबा नागवडे, संतोष नागवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम