#Yavat अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहराध्यक्ष पदी मयुर गुजर यांची निवड


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे शहर व जिल्हा कार्यकारिणी कार्यकारिणीची बैठक झाली या वेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री दिलीपदादा जगताप,राष्ट्रीय चिटणीस श्री दशरथ पिसाळ व महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री अनिल ताडगे, संस्थापक सदस्य श्री जगजीवन काळे यांच्या  प्रमुख उपस्थितीत  सर्व पदाधिकारी यांच्या एक मताने श्री मयुर  सोमनाथ गुजर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली व नियुक्तीचे पत्र मा. दिलीपदादा जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे मा. अध्यक्ष श्री वैभव शिळीमकर, कार्याध्यक्ष श्री मंगेश साखरे, संपर्क प्रमुख राजेश केदारी व राजेंद्र पासलकर, उपाध्यक्ष श्री सुभाषराव ढमाले, उपाध्यक्ष श्री अभिजीत ताठे, पुणे शहर महिला अध्यक्षा सौ.आरतीताई मारणे,
पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सौ. ज्योतिताई कोंडे, जिल्हाध्यक्ष पुणे श्री. प्रशांत वांढेकर, पूर्व जिल्हाध्यक्ष पुणे तुषार शेळके, जिल्हा सरचिटणीस दुष्यंतराजे जगताप व महासंघाचे अनेक सभासद,कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम