Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत प्रत्येकाने मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवा - नायब तहसिलदार प्रवीण सुळ


महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत पिलीव परीसरातील  प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावित मतदानाची टक्केवारी वाढविणयाचे आवाहन माळशिरसचे निवडणूक नायब तहसीलदार प्रवीण सुळ यांनी केले आहे. ते पिलीव येथे  आयोजित करण्यात आलेल्या बि एल‌ओ, मंडलाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत बोलत होते.    

पिलीव येथे येत्या विधानसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने कराव्याच्या उपाययोजना याविषयी पिलीव येथील  ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी पिलीवचे मंडलाधिकारी विजय एकतपुरे, तलाठी कांबळे, तलाठी चव्हाण, ग्रामसेवक बाबर,पिलीवचे माजी सरपंच नितीन मोहीते, माजी उपसरपंच संजय आर्वे, विजय सगरे, बिएल ओ, धनवडे,चौरे,धसाडे ,गोळ तसेच पत्रकार दामोदर लोखंडे, संजय पाटील, प्रमोद भैस, तसेच  अण्णा कोपनर यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                  

Post a Comment

0 Comments