महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
कु. केदार मनोज पवार यांनी कराटे मध्ये स्टेट लेवल गोल्ड मेडल मिळवले चि केदार आणि त्यांचे कोच श्री भरत कोकाटे सर आणि ऋतिक कोकाटे सर यांच्या मार्गदर्शननामुळे मिळाले. केदार पवार मांजरी बुद्रुक
येथील मॅरेथॉन इंग्लिश मीडियम स्कूल शेवाळवाडी चा इयत्ता ७ वी तील विद्यार्थ्यां आहे. खेळात त्याची आवड आहे.
गेले ५ वर्षांपासून तो गोल्डन मार्शल आर्ट्समध्ये किकबॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे आणि या खेळात उत्कृष्ट अशी कामगिरी मिळवण्यात त्याला यश प्राप्त झाले आहे. हे सर्व शक्य झाले श्री. राज कोकाटे सर व श्री. हृतिक कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनामुळे. पुणे येथे झालेल्या डिस्ट्रिक्ट सेलेक्शन मॅचमध्ये गोल्ड मेडल जिंकून, २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या राज्य स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून गोव्यामध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.केदार चे वडिल एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत त्यांचे त्यास मार्गदर्शन लाभत आहे , सर्व स्तरातून त्यास शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
0 Comments