Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras ग्रामस्थ व वन विभाग एकत्र येऊन वन्यजीव संरक्षण व जतन करू - भगवान तांबे


महादरबार न्यूज नेटवर्क - 
तरंगफळ येथील ग्रामस्थ व महाराष्ट्र शासन वन विभाग एकत्र येऊन वन्यजीव संरक्षण व जतन करू आणि निसर्गाची साखळी अबाधित ठेवू असे प्रतिपादन वनरक्षक श्री भगवान तांबे यांनी केले.  ते तरंगफळ येथे वन्यजीव सप्ताह निमित्त जी प शाळा तरंगफळ या ठिकाणी मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच नारायण तात्या तरंगे होते.यावेळी सुजित तरंगे यांनी बोलताना सांगितले की तरंगफळ येथे वनक्षेत्र जास्त असल्यामुळे आणि त्या ठिकाणी वृक्ष लागवड व संवर्धन चांगल्या प्रमाणात झाल्यामुळे वन्यजीवांचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांचा नेहमीच सहभाग असतो वन विभागानेही तरंगफळ गावाच्या विकासासाठी हातभार लावावा जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत तसेच तालुक्यातील प्रत्येक गावातून पाच तरुण निवडून त्या तरुणांना सर्पमित्र म्हणून त्यांना पुरेसे ट्रेनिंग देऊन सर्पमित्र म्हणून घोषित करावे अशी मागणी केली यावेळी वन्यजीव सप्ताह निमित्त शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच सुजित तरंगे ग्रामपंचायत अधिकारी संतोष पानसरे वनरक्षक निखिल गुंड ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष विकास महानवर वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत साळवे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव तरंगे ग्रामपंचायत सदस्य विलास तरंगे युवा नेते अभंगराज तरंगे मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ विद्यार्थी ग्रामस्थ वन्यप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments