Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute माधुरी हत्ती ला परत आणण्यासाठी मंत्री संजय सिरसाट यांच्याकडे सकल जैन समाजाची निवेदनाद्वारे मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालूका जैन समाजाच्यावतीने . सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट  यांना माधुरी (महादेवी) हत्तीणीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी निवेदन देण्यात आले. वैभव शहा यांच्या हस्ते संजय सिरसाट यांना निवेदन देण्यात आले ज्यात माधुरी (महादेवी) हत्तीला त्वरीत महाराष्ट्रत आणावे अशी मागणी केली आहे.

निवेदनादरम्यान मंत्री संजय सिरसाट यांच्यासह माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी या विषयावर चर्चा केली. यामध्ये माधुरी हत्तींचे स्थलांतर न्यायालयीन आदेशानुसार झाले तरी त्यावर संपूर्ण जैन  समाजांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकार आणि प्रशासनांनी या भावनिक विषयाची गांभीर्याने दखल न्यायालयीन निर्णयाचा सन्मान राखत कायदेशीर मार्गाने नागरिकांच्या भावना जपून न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments