Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute नातेपुते पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक

जुलै महिन्यामध्ये नातेपुते पोलिसांनी तब्बल 10,80,000/- सोन्याचे दागिन्यासह किमती मुद्देमाल मूळ फिर्यादीस केला परत


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलीस ठाणे मध्ये वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या  त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार ,cctv बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल 10,80,800/-रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादीस व मूळ मालकास परत केले ते पुढील प्रमाणे


1)गुरनं- 114/2025 BNS कलम 205,318(4) - 1,50,000/- रोख रक्कम
2)गुरनं- 218/2025 BNS कलम 304(2)-60,000/- रुपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे एक सोन्याचा लक्ष्मी हार.
3)गुरनं- 251/2025 BNS कलम 303(2)- 1)1,36,000/- रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन 2)1,60,000/- रुपये किमतीची 19.5 ग्रॅम वजनाची सोन्याची गळ्यातील चैन
4)गुरनं- 254/2025 BNS कलम 304(2)- 79,800/- रुपये किमतीची 9.80 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन व सोन्याचे बदाम.
5)गुरनं- 255/2025 BNS कलम 304(2) - 1,60,000/- रुपये किमतीची 20 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन
6)गुरनं- 252/2025 BNS कलम 304(2)- 1,65,000/- रुपये किमतीची 20.610 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन
7)गुरनं- 248/2025 BNS कलम 304(2)- 1)56,000/- रुपये किमतीचे 07 ग्रॅम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण 2)64,000/- रुपये किमतीचे आठ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन 3)32,000/- रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी 4)18,000/- 2.25 ग्रॅम वजनाचे गळ्यातील मंगळसूत्र.
असे एकूण 10,80,800/- असे वेगवेगळ्या गुन्ह्यातील सोने व रोख रक्कम  किमती मुद्देमाल


जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा. श्री अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक  मा. श्री प्रीतम यावलकर व, मा. श्री नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलूज विभाग, स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक   यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे भव्य प्रांगणात वरील सर्व गुन्ह्यातील फिर्यादी व मूळ मालक यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत करण्यात आली. त्यावेळी सर्व मूळ फिर्यादीच्या चेहऱ्यावर हास्य फुलले व आपली वस्तू परत मिळल्यामुळे पोलिसांचे आभार व्यक्त केले.



यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे श्री महारुद्र परजणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत दिघे पोलीस उपनिरीक्षक तसेच
PN/562 राकेश लोहार,HC/1636 जावेद जमादार, HC/1765  सुभाष गोरे,
HC/1522 महादेव कदम,HC/ 706 राहुल रुपनवर HC/ 1708 विकास बाबर, PC/2058 असलम शेख, PC/2076 सोमनाथ मोहिते, PC/06 अमोल देशमुख, यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचे कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments