Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras अण्णा सेना प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस तहसीलदारांना निवेदन

महादरबार न्यूज नेटवर्क -
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग 965 महामार्गावरील विविध समस्या संदर्भातील निवेदन अण्णा सेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भिंगारदिवे यांनी  तहसीलदार यांना दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महामार्गावरील ब्रिज असणाऱ्या ठिकाणी पथदिवे काही ठिकाणी चालू आहे तर काही ठिकाणी बंद अवस्थेत आहेत अशी अवस्था माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी, कारूंडे बंगला ,मोरोची तसेच मांडवे येथील पुलाची अवस्था आहे.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील नागरिकांची गैरसोय होत आहे. ते लवकरात लवकर सुरू करावेत अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments