#Mumbai:आ. शेखर निकम यांनी कोकणातील जलसंपदा विभागाविषयी अधिवेशनात मांडले विषय
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी अर्थसंकल्प २०२३ अधिवेशनामध्ये आपल्या भागातील शासन दरबारी प्रश्न मांडताना जलसंपदा विभाग संदर्भात विषय मांडताना चिपळूण मधील गाळ काढण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित करुन दुसरा व तिसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध करुन गाळ काढण्याला गती द्यावी याची मागणी सभागृहामध्ये केली.
गडगडी प्रकल्पातील धरणांची ठेकादरांच्या फायद्यासाठी उंची न वाढवता पाणी पुरवठा करण्याचे पाण्याचे कालवे मातीने भरले जातात तसे होऊ नये यासाठी योग्य नियोजन करुन पाणी पाईप कॅनॉल ने आणून ग्रॅव्हटी परिसरीताल गावातील शेतीसाठी व पिण्यासाठी देण्याबाबत भर द्यावा
ऊर्जा विभागातील प्रश्न मांडताना रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना Ag Othar than ने बिल आकारून भरमसाठ बिल आकारत आहेत तो बंद करावा हा हा प्रश्न सभागृहात उचलून धरला
कामगार विभागाबाबत बोलताना ESIC ची अधिसूचना असूनसुद्धा कामगारांसाठी ESIC ची हॉस्पिटल नसल्याने व खाजगी हॉस्पिटले ESIC ला संलग्न नसल्याने याचा लाभ कामगारांना मिळत नाही तरी शासनाने कामगारांसाठी जिल्ह्यामध्ये मध्ये ESIC चे हॉस्पिटल उपलब्ध करुन देणेबाबत सभागृहात मागणी केली.
Comments
Post a Comment