Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune:कोथरूड मधील वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेत नवरात्र निमित्त आगळावेगळा उपक्रम

महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव   
वनाझ परिवार विद्यामंदिर या शाळेत नवरात्र निमित्त यावर्षी एक आगळावेगळा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमामध्ये दररोज एक विषयाची शैक्षणिक साहित्याची माळ तयार करून वर्गात लावून घेतली होती. ही माळ फक्त लावलीच नव्हती तर ती विद्यार्थ्यांकडून तिचे वाचन करून घेण्यात आले. 
    
अशा नऊ दिवसाच्या नऊ माळा प्रत्येक वर्गात लावून नवरात्र उत्सव साजरा केला या नवरात्रात वर्गामध्ये  धान्याचाही घट बसवून विद्यार्थ्यांना धान्यांचे माहिती तसेच घट बसवण्यामागील शास्त्रीय तसेच धार्मिक कारणेही सांगण्यात आली.
तसेच ज्ञानाचा घट बसवून त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्याच्या माळा लावून देवीचा आगळावेगळा जागर करण्यात आला.
     दररोज देवीच्या नऊ रूपांची माहिती तसेच कथा नवरात्र निमित्त विद्यार्थ्यांना   सांगण्यात आली.
           
या उपक्रमाची कल्पना शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका अनिताताई दारवटकर यांनी मांडली तर ते साकारण्यासाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्ग शिक्षकांनी सहभाग घेतला.
कोरोनाच्या दीर्घ कालखंडानंतर विद्यार्थी व शिक्षकांचा या उपक्रमातील सहभाग वाखाणण्याजोगा होता.
       
शनिवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त वर्ग सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होता यामध्ये मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्व स्वर्ग अगदी स्वच्छ, नीटनेटके ,साहित्याने भरगच्च भरलेले होते. वर्ग सजावट स्पर्धेला पालक प्रतिनिधींना परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी त्यांना ग्रीटिंग कार्डस, फुले देऊन स्वागत केले. 
दिनांक १ ऑक्टोबर रोजी सर्वांसाठी भोंडला आयोजित करण्यात आला होता. 
      
ऐलमा पैलमा ,गणेशदेवा
माझा खेळ मांडून घे, करीन तुझी सेवा.......
यांसारख्या भोंडल्याच्या गाण्यांनी वातावरण भारावून गेले होते. यावेळी मुलांना त्यांचा आवडता खाऊ खिरापत म्हणून देण्यात आला.
      
मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी पाटीपूजन घेण्यात आले यावेळी फुलांनी पाटीवर सुंदर सरस्वतीचे चित्र काढून फुले वाहून सरस्वतीची आराधना केली. विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वतःच्या हाताने झेंडूच्या फुलांपासून तोरणे बनवून  आपल्या वर्गाला लावली.
अशाप्रकारे यावर्षी नवरात्र सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला

Post a Comment

0 Comments