महादरबार न्यूज नेटवर्क -
पिरळे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराचे प्रमुख जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य व उप विभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रमोद शिंदे यांच्या वतीने ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
पिरळे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुरोगामी महाराष्ट्र न्यूज परिवाराचे प्रमुख जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सदस्य व उप विभागीय दक्षता नियंत्रण समिती सदस्य प्रमोद शिंदे यांच्या वतीने ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
सालाबाद प्रमाणे पिरळे येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३१ मे रोजी जयंती उत्सव समिती यांच्या वतीने भव्य दिव्य जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते याही वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी सकाळच्या सत्रात प्रतिमा पूजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने पाटील,एपीआय महारुद्र परजणे,मधुकर पाटील उपस्थित होते.यावेळी सुप्रसिद्ध व्याख्याते गावचे पोलीस पाटील औदुंबर बुधावले,ह.भ.प अजित महाराज, खंडागळे ह भ प भाऊसाहेब भिसे,महाराज युवा उद्योजक संदीप शेठ नरोळे,पत्रकार प्रमोद शिंदे, शिवतेज होळकर यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावचे सरपंच अमोल शिंदे उपसरपंच संदीप वाघ सर माजी सरपंच ज्ञानदेव शिंदे,महादेव शिंदे, शिवाजीराव लवटे,दत्तात्रय रुपनवर,गणेश दडस,दशरथ जाधव,प्राचार्य दीपक शिंदे सर,दादासाहेब शिंदे,दत्तात्रेय लवटे, दादासाहेब ठवरे,प्रमोद सेठ डूडू , महादेव होळकर,गोरख साळवे ,मा.उपसरपंच उमेश खिलारे, यांच्यासह माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा प्रतिमा पूजन करण्यात आले.संध्याकाळी ३०० व्या जयंतीनिमित्त पिरळे ग्रामस्थ व युवकांच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत डीजे,एक बँजो पथक व अहिल्या मातेच्या प्रतिमेचे भव्य दिव्य सजवलेल्या दोन रथांचा समावेश होता.
0 Comments