#Natepute:धर्मपुरी जि.प. शाळेच्या स्नेहसंमेलनात बाल गोपाळांच्या कलागुणांचे संस्कृती सातपुते यांनी केले कौतुक
महादरबार न्यूज नेटवर्क -
धर्मपुरी तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या स्नेहसंमेलनात बालकलाकारांच्या आविष्काराने पालकांना मंत्रमुग्ध केले स्नेहसंमेलनाला आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी भेट देऊन बाल गोपाळांच्या कलागुणांचे कौतुक केले.
स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून धर्मपुरी गावचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुकाध्यक्ष बाजीराव काटकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी लोकगीते, हिंदी गीते, पारंपारिक गीते बहारदारपणे सादर करण्यात आली बालचमुंच्या कलागुणांनी प्रेषकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवले होते.
यावेळी गटशिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, माजी सरपंच बाजीराव काटकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय मसुगडे, उपाध्यक्ष छाया पाटील, सदस्या तृप्ती मसुगडे, मेजर मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे, माजी अध्यक्ष छगन पाटील, ग्रामपंचायत चे माजी सदस्य शहाजी मदने, मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे, सहशिक्षक राजाराम ढोबळे, अर्चना पाटील, अनिता पवार, मंगल गायकवाड, सुषमा कुलकर्णी आधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सहशिक्षक राजाराम ढोबळे यांनी केले. मुख्याध्यापक दत्तात्रय झेंडे व शिक्षकांनी बालकलाकारांची जय्यत तयारी करून घेतली होती जिल्हा परिषद केंद्र केंद्रातील शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
Comments
Post a Comment