Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati विद्या प्रतिष्ठान सुपे स्कूल, सामाजिक वनीकरण सुपे व चंदुकाका सराफ अँड सन्स बारामती यांनी पाणवठ्याची दुरुस्ती, रंगकाम करत टँकरने पाणी सोडले


महादरबार न्यूज नेटवर्क -

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज शुक्रवार, दिनांक ५ जून २०२६ रोजी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूल, सामाजिक वनीकरण सुपे आणि चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड बारामती शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशेष पर्यावरणपूरक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सन २०२० मध्ये विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत मेहनतीने आणि श्रमदानातून छप्पन मेरू मंदिर सुपे येथे एक पाणवठा तयार केला होता. उन्हाळ्यात आणि इतर ऋतूंमध्ये पक्षी व प्राण्यांची तहान भागावी, हा यामागील मुख्य उद्देश होता. आज या पाणवठ्याची दुरुस्ती करून त्याला आकर्षक रंगकाम करण्यात आले.

सामाजिक बांधिलकी आणि योगदान विद्या प्रतिष्ठान सुपे स्कूलच्या वतीने सातत्याने विविध पर्यावरणीय आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. शाळेच्या या उल्लेखनीय प्रयत्नांना हातभार लावत, यंदा चंदुकाका सराफ यांनी आपले मोलाचे योगदान दिले. या संयुक्त उपक्रमातून दोन्ही संस्थांनी पर्यावरणाप्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे."केवळ झाडे लावणे नव्हे, तर निसर्गातील प्रत्येक घटकाचे जतन करणे ही काळाची गरज आहे. शाळेच्या कर्मचाऱ्यांनी श्रमदानातून उभारलेल्या या पाणवठ्याला कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) म्हणून चंदुकाका सराफ समूहाने दिलेली साथ कौतुकास्पद आहे.

या उपक्रमाप्रसंगी विद्या प्रतिष्ठान सुपे इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य डॉ. योगेश पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे असिस्टंट ब्रांच मॅनेजर अमित झेंडे,धनंजय माने, प्रसाद चांदगुडे, उपस्थित होते.

भविष्यात देखील समाज उपयोगी कामामध्ये चंदुकाका सराफ सहभागी होतील असे मत सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments