#Varvand/Pune: शेती व पिण्याच्या पाण्यासाठी खडकवासला कालव्यातून दोन उन्हाळी आवर्तने
महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमघर
दौंड चे आमदार राहुल कुल यांची मागणी मान्य
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला कालवा सल्लागार समितीची बैठक शासकीय विश्रामगृह पुणे येथे आज पार पडली.या बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व तसेच जलसंपदा व इतर संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान खडकवासला कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने मिळवीत अशी मागणी केली तसेच जुना मुठा उजवा कालव्याच्या अस्तरीकरण व दुरुस्तीसाठी निधी मंजुर करण्यात आला असून त्याचे काम तातडीने सुरु करावे, खडकवासला ते लोणी काळभोरपर्यंत नवा मुठा उजवा कालव्यासाठी भूमिगत बोगदा, जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या बळकटीकरण आदी अनुषंगाने विविध मागण्या केल्या तसेच शेतकरी व नागरिकांना पाणी टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन व खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी केली.
यावेळी सध्या खडकवासला १६ टीएमसी पाणी शिल्लक असून, त्याचे योग्य नियोजन करीत शहर व ग्रामीण भागाचा समन्वय साधत, कालव्यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पहिले आवर्तन दि. ४ मार्च २०२४ पासून व दुसरे आवर्तन ५ मे २०२४ पासून अशा प्रकारे दोन उन्हाळी आवर्तने देण्याचा निर्णय पालकमंत्री मा. ना. श्री. अजित पवार यांनी जाहीर केला आहे.
Comments
Post a Comment