#Natepute:आई-वडिलांचे उपकार कधीही विसरू नका आपले जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही - ह.भ.प. गणेश महाराज भगत नातेपुतेकर

महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते येथे श्री रमेश पांढरे यांचे वडील कै. कुंडलिक श्रीपती पांढरे यांचे प्रथम पुण्यस्मरण १७ सप्टेंबर रोजी संपन्न झाले. या निमित्ताने ह भ प गणेश महाराज भगत यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती, आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥ येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥ अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥ तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥ हा अभंग त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेऊन आई वडिलांचे किती उपकार आपल्यावर आहेत   हे सांगून सध्या काळाची गरज आहे ती म्हणजे आई-वडिलांची सेवा करणे असे अनेक उदाहरण देऊन समोरील भाविकांना श्रोत्यांना त्यांनी आपल्या कीर्तन सेवेतून मंत्रमुग्ध केले यावेळी दुपारी १२ : ०५ वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली  यानंतर आरती पसायदान घेऊन महाप्रसाद होऊन कार्यक्रमांची सांगता झाली.

यावेळी यावेळी माजी पंचायत समिती सदस्य श्री ज्ञानराज ऊर्फ माऊली पाटील,गणपत पांढरे, साहेबराव देशमुख,सुरेश आण्णा पांढरे, जयराम पांढरे, संतोष आबा वाघमोडे,नगरसेवक रणजित पांढरे,आण्णासाहेब पांढरे, अॅड रावसाहेब पांढरे. अतुल बावकर, तसेच भाजपाचे भैय्यासाहेब चांगण,जगन्नाथ सोनवळ,विठ्ठल पिसे,करमाळकर गुरुजी,किशोर दगडे, पै अक्षय भांड, भैय्या साहेब पांढरे, मधुकर पवार, लक्ष्मण महाराज पिगळे,श्रीकृष्ण महाराज भगत, श्रीराम महाराज भगत, तसेच नातेपुते भजनी मंडळ व पांढरे परिवार,नातेवाईक मित्र मंडळी कार्यक्रमांस उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत