Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune 'वन्स मोअर'चा पाऊस! नितीन खेर आणि प्रीती पेठकर यांच्या गायकीने बालगंधर्व रंगमंदिर मंत्रमुग्ध


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव

२१ ऑगस्टला बालगंधर्व येथे हिंदी जुन्या गाण्यांचा एक अतिशय सुंदर कार्यक्रम झाला.

ऑर्गनायझर व पुण्यातील नामवंत सिंगर श्री नितीन खेर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रसिक प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद.

पुण्यातील सुप्रसिद्ध गायक श्री नितीन खेर व प्रीती पेठकर हे यातील प्रमुख गायक कलाकार होते.

रफी, किशोर  व इतर नामवंत गायकांची जुनी गाणी अतिशय लीलया पद्धतीने श्री नितीन खेर यांनी आपल्या धुंद शैलीने गाऊन, प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले . त्यांच्या सोलो गाण्यांना तर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाच. परंतु नामवंत गायिका प्रीती पेठकर व श्री नितीन खेर यांच्या द्वंद्व गीतांना देखील टाळ्या आणि शिट्यांची प्रचंड दाद मिळाली.

कोणत्याही कार्यक्रमात क्वचितच एखाद्या गाण्याला वन्स मोर मिळतो. परंतु या कार्यक्रमातील बहुतेक गाण्यांना रसिकांनी वन्स मोरचा भरभरून वर्षाव केला.

बरेच दिवसांनी एक दर्जेदार कराओके गाण्यांचा कार्यक्रम ऐकता आला असं बहुतेक सर्व रसिक प्रेक्षकांचं मत पडलं.

गाणी सर्वच बहारदार झालीच, परंतु त्या जोडीला कल्पना जगताप यांचं अँकरिंग देखील तेवढेच बहारदार आणि कौतुकास्पद झालं.

श्री नितीन खेर यांनी स्वतःच्या गाण्यांचा हा पहिलाच कार्यक्रम ऑर्गनाईज केला ,परंतु तो अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तीत आणि खूप यशस्वीपणे पार पाडला असंच म्हणता येईल.

Post a Comment

0 Comments