#Natepute:बायडाबाई पाटील यांची कारुंडे ग्रामपंचायत सरपंच पदी बिनविरोध निवड



महादरबार न्यूज नेटवर्क -
कारुंडे येथील लोकनियुक्त सरपंच अमर महादेव जगताप यांनी गाव पातळीवर ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते. आज दि. 31 जानेवारी रोजी सरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत कारुंडे येथे निवड प्रक्रिया राबवली होती. यावेळी सरपंच पदासाठी  बायडाबाई पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी श्री. चव्हाण यांनी दुपारी दोन वाजता बिनविरोध सरपंच पदी बायडाबाई ज्ञानदेव पाटील यांचे नाव घोषित केले.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री चव्हाण यांना  सरपंच निवडीसाठी तलाठी लोखंडे, ग्रामविकास अधिकारी मोरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले .
सरपंच निवडीनंतर दोन्ही पार्टीतील कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. सरपंच निवडीनंतर श्री नाथ मंदिर येथे जाऊन नूतन सरपंच यांनी श्री नाथ चरणी आशीर्वाद घेतले.
बिनविरोध सरपंच निवडीबद्दल सरपंच बायडाबाई पाटील यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
 


यावेळी माजी सरपंच हनुमंत पाटील,  माजी सोसायटी चेअरमन सुभाष पाटील, माजी सरपंच अमर जगताप, माजी उपसरपंच महादेव रुपनवर, उद्योगपती दत्तात्रेय शेळके, पंचायत समिती सदस्य संगीता शेळके, विजय गायकवाड माजी सरपंच, माजी उपसरपंच जगन्नाथ लोंढे, ग्रामपंचायत सदस्य बायडाबाई रुपनवर, सुवर्णा कर्चे, सुमित्रा रुपनवर, सविता शिंदे, सविता नामदास, सुवर्णा गोसावी, महेश मसुगडे, सागर सूर्यवंशी, कैलास गायकवाड इ. ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच विजय रुपणवर, शिवाजी आण्णा रुपनवर, विजय मस्कर, दादासो भगत, किसन झजे, भास्कर शिंदे, संभाजी पाटील, किरण पाटील, आबा माने, तानाजी पाटील, तुषार पाटील, सुनील पाटील, माऊली गायकवाड यासह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी नातेपुते पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली  बीट अंमलदार भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नूतन सरपंच सर्वांना बरोबर घेऊन गावचा विकास करतील. राजकारण न करता विकास कामे मार्गी लावतील.
हनुमंत पाटील - माजी सरपंच ग्रामपंचायत  कारुंडे

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम