#Pune:ह भ प निवृत्ती बुवा पैठणकर यांचे निधन
महादरबार न्यूज नेटवर्क -
आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील रथामागे ९३ दिंडीचे मालक गुरुवर्य.ह.भ.प. निवृत्ती बुवा पैठणकर भगत यांचे मंगळवार १ फेब्रुवारी रोजी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले ते ९० वर्षांचे होते.जुन्या पिढीतील ज्येष्ठ वारकरी व्यक्तिमत्त्व होते. तसेच त्यांचे संत साहित्यातील अनेक अभंग मुकगत होते,आळंदी, देहू, पंढरपूर, पैठण,त्र्यंबकेश्वर,अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी त्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन व या माध्यमातून वारकरी सांप्रदयाचा प्रसार प्रचार त्यांनी केला तसेच आळंदी येथे माऊलींच्या मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक द्वादशी दिवशीची महापूजेचा नेम अनेक भाविक भक्तांकडून त्यांनी सुरू केला.
अन्नदानाच्या बाबतीत आळंदीमध्ये त्यांचे नाव लौकिक होते. सर्व साधुसंताच्या पुण्यतिथी जयंती उत्सव गावोगावी त्यांनी सुरू केले. आळंदी पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी ते होते तसेच नेमाचे भजन यासाठी निवृत्ती बुवा पैठणकर हे महाराष्ट्रभर सांप्रदायातील लहानथोरांना परिचीत होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असतानाही हातात काठीचा आधार घेऊन. त्यांनी सप्ताहच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपली भजनाची सेवा अत्यंत निष्ठेने पार पाडले
त्यांच्यावर अंत्यसंस्कार समस्त वारकरी संप्रदायातील मंडळींच्या उपस्थितीमध्ये आळंदी येथे इंद्रायणीच्या काठी करण्यात आले त्यांच्या पश्चात ह भ प नामदेव महाराज भगत पैठणकर भगत परिवार असा आहे त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.
Comments
Post a Comment