#Satara:माजी विद्यार्थ्यांनी बदलला शाळेचा चेहरामोहरा...
वैयक्तिक देणगीतून रंगवली शाळा
महादरबार न्यूज नेटवर्क - एकनाथ वाघमोडे
वावरहिरे ता.माण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री पाणलिंग विद्यालयाचा चेहरामोहरा माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्तपणे देणगीतून बदलला आहे.या शाळेत वावरहिरे तसेच आजूबाजूच्या परिसरातून शिक्षणाचा दर्जा चांगला असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी येत असतात.शाळा गेले काही दिवसात मोडकळीस आलेली असतानाच वावरहिरे गावातीलच काही चांगल्या हुद्द्यावर कार्यरत असणारे माजी विद्यार्थी शाळेचं ऋण फेडण्यासाठी पुढं सरसावले असून त्यांनी स्वखर्चातून शाळेच्या इमारतीसंदर्भात बांधकाम आणि रंगरंगोटी करण्याचं काम सुरू केलं असून ते एक तृतीयांश टक्के काम पूर्णत्वाला गेले असून आपली शाळा सुंदर शाळा व्हावी यासाठी अनेकजण माजी विद्यार्थी सढळ हाताने मदत करत शाळेला नटवण्यासाठी प्रयत्नरत आहे.
अगदी याचप्रमाणे या पाणलिंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी असणारे डंगिरेवाडी गावचे सुपुत्र आणि या पाणलिंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी कलर कॉन्ट्रॅक्टर श्री.दुर्योधन पांडुरंग काळूखे हे बंगळुरू येथे चांगल्या पद्धतीने रंगकाम व्यवसाय करत आहेत,तर श्री.लालासाहेब दादासाहेब जगदाळे हे हवाईदलातुन निवृत्त झालेले पदाधिकारी आहेत.शाळेच्या प्रति सामाजिक जाणिवेचे भान ठेवून त्यांनी शाळेला रंगवण्यासाठी पुढाकार घेतला आणि शाळेला रंगवलं देखील.यामुळे शाळेचा चेहरामोहरा बदलला असून शाळेचा होणारा जीर्णोद्धार पाहता येत्या अनेक पिढ्या विद्यार्थ्यांना शिकता येणार आहे.
शाळेतील वातावरण चांगलं असेल तर विद्यार्थ्यांना शिकण्याचा हुरूप येऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळते.यामुळे येणाऱ्या पिढ्यांना चांगलं शिक्षण मिळाव,यासाठी रयत शिक्षण संस्था आणि गावातील स्थानिक लोक प्रयत्नरत आहेत.त्यातच सढळ हाताने मदत करत माजी विद्यार्थी भर घालत असल्याने शाळेचा विकास झपाट्याने होतोय.शाळा रंगवण्याकामी माजी विद्यार्थी धनाजी भोसले यांनीसुद्धा आपल्या शाळेसाठी पेंटींगचे काम मोफत करण्याचा मनसुबा तयार करून त्या कामाला गतीही दिली आहे.
देणगीदार व्यक्तींचा पाणलिंग विद्यालयामार्फत सन्मान केला जात आहे,त्याचबरोबर येथील शिक्षकवर्गही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.शाळा डागडुजी आणि शाळेच्या विकासासाठी अनेक चांगल्या हुद्द्यावर काम करत असलेल्या माजी विद्यार्थी तसेच गावच्या नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत करण्याचे आवाहन शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक खराटे ए. जी.यांनी केले आहे.
Comments
Post a Comment