#Yavat:PMRDA च्या लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये तातडीने वर्ग करावेत -आमदार राहुल कुल
महादरबार न्यूज - संतोष जगताप
पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेतील दौंड तालुक्यातील लाभार्थ्यांना वर्क ऑर्डर मिळाल्या असून अनेक लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे सुरू आहेत.
अनेक घरकुलांचे प्लिंथ लेव्हल पर्यंतचे काम पूर्ण झाले असुन संबंधित यंत्रणेमार्फत स्थळ पाहणी, जिओ टॅगिंग आदी प्रक्रिया पूर्ण होऊन २-३ महिन्यांचा कालावधी लोटला आहे परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावर एकूण २.५ लक्ष अनुदानापैकी १ लक्ष रुपये अनुदानाचा पहिला हफ़्ता जमा झालेला नाही त्यामुळे पुढील कामे प्रलंबित आहेत अनुदानाचा पहिला हफ़्ता तातडीने वर्ग करण्यात यावा यासाठी आज PMRDA चे आयुक्त डॉ. सुहास दिवसे साहेब यांची आमदार राहुलदादा कुल यांनी भेट घेतली व लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये तातडीने वर्ग करणे बाबत संबंधिताना आदेश द्यावेत.
Comments
Post a Comment