अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड तालुका पोलीस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन दौंड तालुका आणि ग्रामपंचायत कार्यालय उंडवडी यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद जयंती उंडवडी ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली.
उंडवडी गावचे सरपंच सौ दीपमाला सतीश जाधव आणि मराठा महासंघ हवेली तालुक्याचे उपाध्यक्ष अतुल मोरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून दौंड तालुका युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.यावेळी जयंती बद्दल मार्गदर्शन मनोगत जिल्हाध्यक्ष मयूर आबा सोळसकर यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये अखिल भारतीय युवक मराठा महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष मयूरआबा सोळसकर, पोलिस फ्रेंड वेल्फेअर असोसिएशन दौंड तालुका अध्यक्ष सचिन गुंड, युवक अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, उद्योग व्यापार आघाडी अध्यक्ष सुरज चोरगे, शेतकरी मराठा महासंघ दौंड तालुका अध्यक्ष विशाल राजवडे,विद्यार्थी आघाडी अध्यक्ष समीर लोहकरे, दौंड तालुका मराठा महासंघ कार्याध्यक्ष दत्ताशेठ महाडिक,
दौंड तालुका विद्यार्थी आघाडीचे सचिव श्रीकांत जाधव, उद्योग व्यापार आघाडीचे सरचिटणीस अतुल आखाडे,कासुर्डी मराठा महासंघ शाखा अध्यक्ष सुरज आखाडे,दौंड तालुका माथाडी उपाध्यक्ष रोहित कांबळे,उंडवडी ग्रामपंचायत सदस्य चिंतामणी लोहकरे,
माजी सदस्य रोहिदास जाधव,भिकू कांबळे,विजय जाधव, सतीश लोहकरे,जेष्ठ मार्गदर्शक माणिकभाऊ नवले, उंडवडी मराठा महासंघ सदस्य सुरज लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजन तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे,ग्रामपंचायत सदस्य मैनाताई गुंड, सतीशराव जाधव आदी मान्यवरांनी केली होते.
यावेळी उपस्थिती बद्दल सर्वांचे आभार तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी मानले.
0 Comments